स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूल येथे दही हंडी कार्यक्रम उत्सहात साजरा
मुक्ताईनगर दि.२१(प्रतिनिधी):कित्येक वर्षांपासून कोरोनाची सावट असल्या कारणाने दहीहंडी उत्साहास बंदी होती, परंतु कोरोना सावट संपल्याने पुन्हा दहीहंडी उत्साह सुरु झाले.
मुक्ताईनगर येथील स्व.निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आज दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे प्राचार्य श्री वसंत वडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली व संबधित वर्गशिक्षिकांच्या सहकार्याने KG 1, KG 2 इ.पहिली दुसरी च्या मुला मुलींनी कृष्णा राधा,गोपीया याच्या भूमिका अतिशय थाटामाटात पार पाडल्या.स्व निखिलभाऊ सेमी इंग्लिश शाळेत जणू कृष्ण नगरीच अवतरली असे दृश्य सगळीकडे दिसत होते.इ 10 वी पर्यंत सर्वच विदयार्थ्यांनी दहीहंडी कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
दही हंडी फोडण्याचा मान हा 9वी 10 विच्या विदयार्थ्यांनी मिळवला शाळेचे प्राचार्य श्री वसंत वडस्कर सर ,सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी अनमोल असे सहकार्य व मार्गदर्शन केले, या सर्वांच्या सहकार्याने स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश शाळेने जणू कृष्ण नगरीचे रुप धारण केले असा भास सर्वांनांनाच होत होता. अशा या आनंदमयी वातावरणात आजचा हा दहीहंडीचा उत्सव पार पडला
