*वाघाडी नदीमध्ये बुडून तरुणाचा करूण अंत..कारेगाव यावली येथील घटना..
अकोला बाजार दि.०२( प्रतिनिधी प्रवीण राठोड)वडगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारेगाव यावली येथील तरुण आपल्या शेतात खत देऊन, कामे आटोपून घरी आला होता, तरुण हा वाघाडी नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले असता, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे तरूण नदीमध्ये बुडाला.ही घटना माहीत होताच गावातील नागरिकांनी एकच धाव नदीकडे घेतली . व वडगाव पोलिस ठाण्याला कळविण्यात आले, लगेच पोलिसानी रेस्क्यू ऑपरेशन, आपत्कालीन टीम ला पाचारण केले. ही घटना रविवार दिनांक 31-जुलै 2022 रोजी घडली असून या तरुणांचा शोध रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत लागला नाही. तो नदीच्या डोहातच बुडून असल्याचा अंदाज रेस्क्यू टीम ने केला होता. सदर मृतदेह हा दिनांक 01 ऑगस्ट ला सकाळी 8 च्या दरम्यान मिळाला असून त्याचे शव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओम प्रल्हाद चव्हाण असे या तरुणाचे नाव असून, याने हल्लीच 10 वि परीक्षा पास केली होती. वडगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पवन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली
ASI भाऊराव बोकडे, धनंजय शेखदार, यांनी पुढील तपास करीतआहे, अशी माहिती आज दिनांक 01 ऑगस्ट 2022 मिळाली आहे.