धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी गाठी*


 *धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी गाठी


धरणगाव दि.०२(प्रतिनिधी):    माजी मंत्री आ.गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी धरणगाव शहर तसेच तालुक्यात भवरखेडे, साकरे, बोरगाव येथे द्वारदर्शन करून संबंधित कुटुंबाचे सांत्वन केले. 

याप्रसंगी  भवरखेडे येथे माजी सरपंच संजय लोटन भामरे आणि माजी सरपंच समाधान प्रकाश पाटील यांचा वाढदिवस असल्याने माजी मंत्री आ.गुलाबरावजी पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी दिल्या. सोबत उगलाल पाटील, प्रशांत प्रकाश पाटील, ग्राप सदस्य राजू माळी, शामकांत पाटील माजी सरपंच उपस्थित होते. 

साकरे येथे सुरू असलेल्या स्वामीनारायण मंदिर बांधकामाची पाहणी जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केली यावेळी गावातील पदाधिकारी, भाविक, ग्रामस्थ यांनी मंदिरामागील रस्ता कॉक्रीटीकरण करावे अशी विनंती केली असता सदर रस्ता लवकरात लवकर काँक्रीटकरण करण्यात येईल अशी ग्वाही जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी दिली. याप्रसंगी गोकुळ गुजर.सुधाकर पाटील.सरपंच शरद पाटील उपस्थित होते बोरगाव येथे द्वारदर्शन करण्यासाठी गेले असता सोबत नितीन पाटील, भैय्या सर, पिंटू पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने