राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध.


उरण दि ०२(विठ्ठल ममताबादे ) दि. 01/08/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता उरण तालुका काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षा तर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. असं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.कोश्यारी यांनी केलेल्या वक्ततव्या मुळे तमाम मराठी माणसाचे व महाराष्ट्रातील जनतेचे मन दुखावले आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा उरण तालुका व शहर काँग्रेस तर्फे उरण तालुका काँग्रेस कार्यालया बाहेर काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध केला.यावेळी उरण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष -प्रकाश पाटील,जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण विधानसभा अध्यक्ष भालचंद्र घरत,अमरीन मुकरी,रवी मढवी, शैलेश तामगाडगे,निलेश मर्चंडे,दिलीप जाधव,आयाज फकी,सुनील काटे ,सदानंद पाटील ,जी डी पाटील ,रमेश पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने