अनुसूचित जमाती महिला राखीव पट्टाणकडोली गट नियमांनुसार आरक्षित.. आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरू कोळी महासंघाचे धनंजय कोळी यांचा इशारा
कोल्हापूर दि.०२(प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषद आरक्षण सोडत नुकतेच जाहीर करण्यात आले असून पट्टाणकडोली मधील अनुसूचित जमाती महिला साठी राखीव ठेवण्यात आले आहे मात्र या गटात अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असल्यावरही काहि असंतुष्ट लोक ह्या आरक्षणावर हरकत घेत आहेत. त्यामुळे या गटात तणावाचे वातावरण निर्माण होतं आहे तरी शासनाने जाहीर केलेलं आरक्षण हे नियमानुसार असून ते जैसे थे ठेवा अशी जोरदार मागणी कोळी महासंघाचे तालुका युवा अध्यक्ष धनंजय कोळी यांनी यांनी केली आहे. आरक्षणावर कोणी बोटं ठेवत जनतेच्या भावनां दुखविण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद चे आरक्षण सोडत जाहीर होताच काही संधी साधून लोकानी हातकंणगले तालुका मधील पट्टाणकडोली मधील अनुसूचित जमाती महिला साठी राखीव ठेवण्यात आलेने काही लोकांनी या वरती हरकत घेऊ काही नी तर या ठिकाणी अनुसूचित जमाती ची लोकसंख्या नाही असे मुद्दे उपस्थित करत आहेत व लोकां मधे तणावाचे वातावरण तयार करत आहेत त्या अनुसरून कोळी महासंघाचे तालुका युवा अध्यक्ष मा धनंजय कोळी यांनी अशी माहीती दिली की पट्टणकडोली जि.प. मतदार संघात अनुसूचित जमाती ची लोकसंख्या १६२४ इतकी आहे व त्यांनी विरोध करणारे लोकांना असे ही प्रश्न विचारायला आहे की कोळी महासंघाचे अध्यक्ष आ.रमेश दादा पाटील यांनी कोळी जमाती ची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणून जवळ पास 30 लाखांहुन अधीक निधी पट्टणकडोली ग्रामपंचायत साठी दिला होता तो निधी कोठे खर्च केला यांचे उत्तर ही विरोध करणारे लोक यांनी नागरिकांना द्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला व हि पट्टणकडोली जि.प.ची अनुसूचित जमाती ची आरक्षित जागा टिकवण्यासाठी कोणत्याही लढाई साठी आम्ही तयार आहोत समाज बांधवांच्या पाठीशी कोळी महासंघ कायम उभा राहिल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.