निवृत्त आरोग्यसहाय्यक आशा गजरें यांच्या कार्याचा पंतप्रधानांकडून गौरव
चोपडा, ता. ०१ (प्रतिनिधी): येथील निवृत्त आरोग्यसहाय्यक आशा पंडित गजरे यांनी कोरोना प्रादुर्भावात नागरिकांची घरोघरी जात आरोग्य सुविधा पुरविल्या याचीच दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचे मेलद्वारे कौतुक केले आहे.
आशा पंडित गजरे यांनी कोरोना काळात कोरोना लसीकरण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून कोरोनापासून संरक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले. स्वतः घरोघरी जाऊन प्रवृत्त केले. कार्यक्षेत्रातील आदिवासी वस्तीतील लोकांना प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनजागृती करून लसीकरण मोहीम राबविली. कोरोना काळात स्वतः कोरोना संसर्ग झाल्याने तब्येत बिघडली तरीसुद्धा लोकांच्या मनातील भीती
दूर करून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे व्यवस्थापन केले. या काळात स्वतःच्या आईचे निधन झाले. तरीदेखील न डगमगता त्यांनी पुढे चालण्याचा मार्ग शोधत त्यांच्या सेवेचा लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून दिला आणि त्यामुळेच अतिदुर्गम भागात सेवा पोचली. त्यांच्या कामाची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत त्यांची प्रशंशा केली या त्यांच्या अविरत सेवेबद्दल या अगोदर त्यांना संस्थांनी व शासकीय संस्था अनेक पुरस्कारांनी गौरवले. त्यामध्ये दामिनी पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार आयडॉल्स महाराष्ट्र, राजीव गांधी आदर्श कर्मचारी पुरस्कार, बेटी बचाओ बेटी पढाओ व केंद्र शासनाने सुद्धा त्यांच्या या अगोदरच्या अति उत्कृष्ट कार्याबद्दल तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पाच डिसेंबर २०१९ ला नॅशनल लॉरेन्स नाइटिंगेल अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.