*एस एन आर जी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे घोडगाव व वाळकी येथे वृक्षारोपण*
गलंगी,ता.चोपडा दि.०१ ( प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी ) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस एन आर जी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वृक्ष संवर्धन सप्ताहांतर्गत वृक्षारोपणासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात फॅन्सी ड्रेस, चित्र रंगवणे यासारखे उपक्रम होते यात घोडगाव व वाळकी येथे गावातून वृक्ष संवर्धन रॅली काढण्यात आली, त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य व नृत्य सादर करून वृक्षांचे महत्व सर्वाना पटवून दिले सोबत ' सेव्ह ट्रीज, सेव्ह लाईफ' 'पेड लगाओ, पेड बचाओ' यासारख्या विविध घोषणा दिल्या, वेगवेगळ्या वृक्षांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, घोडगाव येथे शालेय परिसरात वृक्षारोपण संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, संस्थेचे संचालक भानुदास पाटील, पी एच महाजन सर, सी बी निकुंभ हायस्कुलचे मुख्याध्यापक आर पी चौधरी तसेच विद्यार्थ्यांचे पालक व शाळेतील शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. तर वाळकी येथे गावातील जेष्ठ नागरिक देविदास जगतराव पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक धीरज पाटील, राजेंद्र पाटील, मनोहर पाटील, चंद्रभान पाटील व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले, वृक्ष संवर्धन सप्ताहाचे महत्व, अशा प्रकारच्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे व भविष्यातील संकटांची जाणीव व्हावी यासाठी हे उपक्रम महत्वाचे आहे अशी माहिती शाळेच्या प्राचार्या जेनिफर मथायस यांनी सांगितली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे नाट्य बसवणे व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कल्पेश साळुंखे सर यांनी केले, विद्यार्थ्यांचे नृत्य शुभांगी दाभाडे व चैताली धनगर यांनी बसवले तर घोषणा शुभांगी पारधी यांच्यासोबत जयश्री कोळी व राजेश सर यांनी परिश्रम घेतले.