पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची रक्तपेढीला भेट*


*पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथील इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची रक्तपेढीला भेट* 


चोपडा दि.०१ ( प्रतिनिधी) :---

      'रक्तदान श्रेष्ठ दान' हा संदेश रुजवण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, आजच्या पिढीला रक्ताची गरज भविष्यात कशा प्रकारे पूर्ण केली जाईल, रक्तदानासाठी जनजागृती व्हावी, रक्तदान करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, रक्तदान कोण करू शकते? साठवलेल्या रक्ताचा उपयोग कशा प्रकारे केला जातो?  रक्तगट तपासणी कशी होते? रक्ताशी संबंधित विविध आजारांवर आपले शंकांचे निवार एजण करण्यासाठी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची रक्तपेढीला भेट पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने आयोजित केली. रेड क्रॉस सोसायटी चोपडा येथील चेअरमन ताराचंद जैन व त्यांचे सहाय्यक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन समाधानी केले. या उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक  इब्राहिम तडवी, विशाल मराठे, सौ. भाग्यश्री बारी यांनी परिश्रम घेतले  व प्राचार्य मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाला पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले यांचे 

मार्गदर्शन लाभले. तसेच पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील, पंकज माध्यमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक व्ही.आर. पाटिल, पंकज कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चे प्राचार्य डाॅ. वाघमोड़े, पंकज बाल संस्कार केंद्राच्या  प्रमुख सौ. रेखा पाटील, पंकज इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य गणेश साळूंखे यांनी उपक्रमा चे कौतूक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने