पंकज प्राथ. विद्यालयात लो. टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी...
चोपडा दि.०१( प्रतिनिधी) :--- येथील पंकज प्राथमिक विद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
लोकमान्य टिळकांचे जीवनकार्य व विस्तृत माहिती विद्यालयातील शिक्षक अनिल पाटील यांनी विशद केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, टिळक लहानपणापासून खूप हुशार होते. गणित व संस्कृत विषय त्यांचे आवडीचे होते. ते नियमित व्यायाम करत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक, थोर कवी व लेखक होते. त्यांची लेखणी तलवारी सारखी धारदार होती. आपल्या लेखणीने व वाणी ने ते आज अजरामर आहेत.
१ ऑगस्ट निमित्ताने इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यासाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले असल्यामुळे शाळेचे वातावरण चैतन्यमय झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी एस जाधव, अनिल पाटील, दिलीप जैस्वाल, आर डी पाटील, मनोज अहिरे, प्रशांत पाटील, महेश गुजर, गोपाल पाटील, गणेश राजपूत, जयश्री पाटील, प्रियंका पाटील, वेदिका पाटील आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केले...