चोपडयाच्या बहिण-भावाची शिरपुर पॉलिटेक्निकमध्ये गगन भरारी.. सिव्हिल डिप्लोमात कु.अनुष्का शिरसाठ हिस ९२.५६ टक्के सर्व प्रथम तर पवन शिरसाठ ८१ टक्के गुण मिळवत कॉम्प्युटर डिप्लोमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण*

 *चोपडयाच्या बहिण-भावाची  शिरपुर पॉलिटेक्निकमध्ये गगन भरारी.. सिव्हिल डिप्लोमात कु.अनुष्का शिरसाठ हिस ९२.५६ टक्के सर्व प्रथम तर पवन शिरसाठ ८१ टक्के  गुण मिळवत कॉम्प्युटर डिप्लोमात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण* 


चोपडा दि.०१(प्रतिनिधी)शिरपूर येथील आर.सी.पटेल पॉलिटेक्निक कॉलेजचा तृतीय वर्ष सिव्हिल डिप्लोमा निकाल नुकताच जाहीर झाला असून चोपडा येथील कु.अनुष्का संजीव शिरसाठ हिने शेकडा ९२.५८ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर कॉम्प्युटर डिप्लोमामध्ये कु.पवन  संजीव शिरसाठ याने शेकडा ८१टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याने दोन्ही बंधू भगिनींचे यशाबद्दल  तालुक्याभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


दोन्ही भावंडाचे यशाबद्दल मनपा माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.शांतारामदादा सोनवणे, आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे, शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेचे राज्य सरचिटणीस सुभाषजी लोमटे,महाराष्ट्रअध्यक्ष शे.शे.म.पं प्रकाश शिंदे पुणे,  , सर्वोदय मंडळाचे प्रदेश अध्यक्ष , चंद्रकांत चौधरी, जिल्हा बँक उपाध्यक्ष

शामकांत सोनवणे    जळगाव, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य संजीव शिरसाठ, ग.स.संचालक मंगेश भोईटे, कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष कैलास शिरसाठ,शिक्षक सेनाअध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, जळगाव उप महापौर डॉ.आश्विनभाऊ सोनवणे,सौ भावना माळी सरपंच अडावद, गणदास बारेला,प्रताप पावरा सदस्य आदिवासी विकास प्रकल्प यावल,सौ नायजाबाई पावरा,बिराम बारेला,गुलाब बारेला, देवसिंग पावरा, यासु बारेला माजी सरपंच,संजय बारेला बालसिंग बारेला, प्रताप बारेला,नामसिंग बारेला आदिंनी अभिनंदन केले आहे.

उत्तुंग यश संपादन करणारे दोघं मुले हे आदिवासी लोक सेवक संजीव शिरसाठ यांचे असून तिला तिच्या यशाबद्दल प्रा.अमोल पाटील,प्रा.दिपक वाघ,प्रा.विकास देवरे,प्रा.हुजेफा शेख यांनी अनमोल मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने