ग्रामीण भागातील गरिब विद्यार्थ्यांचे रोजगाराचे आशास्थान असलेलं व्यक्तीमत्व अवलिया" पत्रकार महेंद्र पाटील"
हाक देतातच काेणताही स्वार्थ मनात न ठेवता मदतीसाठी धावून येणाऱ्या धडपड्या व्यक्तीमत्वामध्ये महेंद्र पाटील वरगव्हाण (पुणे) यांचा समावेश हाेताे. मैत्रीच्या दुनियेतील जादूगार असलेल्या या अवलियाने अल्पावधीत चोपडा नव्हे तर देशभरातील नागरिकांच्या मनात आदराचे स्थान मिळविले आहे. एका कंपनीत हेल्पर व नंतर मालक झालेल्या या व्यक्तीमत्वाने अनेक गाेर गरिबांच्या मुलांना पुण्यासारख्या शहरात रोजगार मिळवून दिला आहे. आज त्यांचा वाढदिवस त्यनिमित्त अल्पशी माहिती आपल्यासाठी..!
चोपडा तालुक्यातील वरगव्हाण या छाेट्याशा गावातील रहिवासी महेंद्र ज्ञानेश्वर पाटील यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे बालपण आणि शिक्षण हे बिडगाव तालुका चोपडा गावातच झाले आहे तर पुढील शिक्षण धानोरा, पुणे आदी ठिकाणी झाले आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर काशीराम पाटील हे अशिक्षीत होते तरी देखील त्यांनी आपल्या 1 मुले व 2 मुलींचे शिक्षण योग्य प्रकारे केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजक महेंद्र ज्ञानेश्वर पाटील लहानपणापासून यांना समाजसेवेची आवड आहे. बारावीत नापास झाल्यावर त्यांनी त्यांचा प्रवास हा पुण्यात वळवला सुरुवातीला 1500 रुपया पगारात काम करून 2 वर्षात त्याच कंपनीत ते सुपरवायझर... मॅनेजर व स्वतः मालक झाले. हे त्यांच्या अधांग परीश्रमा चे फळ आहे. नंतर आपण सातपुडा पायथ्याशी राहतो आपल्या सारखे खुपच गरीब मुलांना नोकरीसाठी तयार करून आज जळगाव जिल्ह्यातील कमीत कमी 500 लोक त्यांच्या कडे काम करीत आहे. त्यानंतर होत असलेल्या भ्रट्राचार व गरीब लोकांच्या वर झालेला अन्याय दाखवण्यासाठी त्यांनी पत्रकारिता जॉईन केली, ग्रामीण भागात अल्पावधीतच उत्कृष्ठ पत्रकार म्हणून लाैकिक मिळविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील बातम्या चक्क न्यूज मध्ये येऊ लागल्याने पाटील यांनी अल्पावधीत वेगळीच ओळख मिळवली. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी एका चॅनल वर खान्देश ब्युरो1 चीफ म्हणून काम केले. सामाजिक बातम्यासाेबतच करत असलेली शाेध पत्रकारिता ही खराेखर काैतुकास्पद अशीच होती. तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून चोपडा तालुक्यातील विविध पक्षाचे पुढारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनेतील समाजसेवक व सर्व सामान्य व्यक्तींना त्यांनी आपलेसे केले आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक मित्राचा गाेतावळा जमा केला असून ते नेहमी म्हणतात की आज मी मिळविले मित्र हीच माझी खरी संपती आहे. एवढेच नव्हे तर आपल्या समाजात देखील पाटील यांचे नाव माेठ्या काैतुकाने घेतले जाते. तसेच त्यांच्या कार्याचा त्यांना अभिमान देखील वाटताे. पत्रकारिता करीत असतांना त्यांनी आपल्या लिखाणातून अनेक प्रश्नांना वाचा फोडून आपल्यात असलेल्या धाडसीवृत्तीचे दर्शन वाचकांना अनेक वेळा घडविले आहे. हसतमुख राहून सदैव शोध पत्रकारिता करणारे महेंद्र पाटील हे नेहमीच चांगल्या आपल्या जिल्ह्यातील मुलांना नोकरी कशी देता येईल यांच्यासाठी धरपडत असतात.
10 पास मुलगा, एक ग्रामीण भागातील राहणारा एक पुण्यासारख्या शहरात स्वतः चा व्यवसाय सुरु करतो व अखिल भारतीय पञकार महासंघ संघटनेच्या कार्याध्यक्ष व अखिल भारतीय गुर्जर देवसेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य , अखिल भारतीय मानव अधिकार कार्याध्यक्ष जळगाव जिल्हा पदापर्यंत पाटील यांनी मजल मारली आहे. महेंद्र पाटील यांचा आज (१ ऑगस्ट) वाढदिवस असल्याने त्यांना मंगलमय शुभेच्छा… आणि भविष्यात त्यांच्या हातून चांगेल कार्य घडाे... त्यांच्या लेखनीतून गाेर गरिब जनतेला न्याय मिळवून देवाे हीच सदिच्छा…!