प्रगती माध्यमिक शाळेत रंगली चित्रकला स्पर्धा

 प्रगती माध्यमिक शाळेत रंगली चित्रकला स्पर्धा

जळगाव दि.०१ ( प्रतिनिधी) विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्याl प्रगती माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलांची शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण एकूण 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेचा विषय वृक्षरोपण ,व कोविड लसीकरण सेंटर, हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा पाटील मॅडम यांनी केले. परीक्षक म्हणून ज्योती बागुल मॅडम, श्री सुभाष शिरसाठ सर, व सुवर्णा पाटील मॅडम यांनी , यांनी परीक्षण केले. स्पर्धेसाठी हर्षदा पाटील मॅडम, अनिल वाघ सर, दीपक बारी सर, भाग्यश्री तळले मॅडम, रुबीना तडवी मॅडम, प्रियंका वाणी मॅडम, या सर्वांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धेस संस्थेचे विश्वस्त माननीय ओसवाल सर, संस्था अध्यक्ष श्रीमती मंगला दुणाखे मॅडम, सचिव सचिन दूनाखे, यांनी शुभेच्छा दिल्या. सदरील स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला आला. प्रथम क्रमांक , तनिषा दत्तात्रेय बडगुजर इयत्ता दहावी, व रामेश्वर संजय नाईक इयत्ता दहावी, द्वितीय क्रमांक, सोहम जयकुमार शर्मा आठवी, आणि उत्तेजनार्थ रोहित संजय सपकाळे, नववी या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने