मातीचे आरोग्य सांभाळा-तुमचे आरोग्य सुधारेल डॉ.प्रशांत राजपुत यांचे मत गणपूर(ता चोपडा)ता ०१:गेल्या काही दशकात खते, कीडनाशके आणि तणनाशकांच्या वापराने जमिनीचे आरोग्य बिघडले असून आपले आरोग्य व्यवस्थित राखायचे असेल तर जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे. असे मत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ प्रशांत राजपूत यांनी चोपडा येथील गोवर्धन गोशाळेत अरण्या फार्मस विरवाडे व विठ्ठल-अँफ्रो-बीसीआय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने "अन्न हेच औषध "या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. विधान सभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी,वसंतलाल गुजराथी,प्रदीपभाई गुजराथी,यावेळी उपस्थित होते. आज दिसणाऱ्या अनेक व्याधींचे मूळ अन्न आणि पाण्यात असून रासायनिक वापर वाढल्यानंतर ते दिसून आल्याचे डॉ.राजपूत यांनी यावेळी सांगितले. विठ्ठल ऍफ्रो बीसीआय चे प्रमुख प्रदीपभाई गुजराथी यांनी प्रास्ताविकात डॉ राजपूत यांच्या शेती प्रयोगांची माहिती दिली.उपस्थितांचे आभार नोडल अधिकारी संजय देशमुख यांनी मानले. व्याख्यांनाला विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवर तसेच रावेर तालुक्यातील केळी उत्पादनातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते...........
चोपडा..उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करतांना डॉ प्रशांत राजपुत