महिला मंडळ शाळेच्या स्काऊट गाईड पथकाने केली मंदिर परिसराची स्वच्छता

 महिला मंडळ शाळेच्या स्काऊट गाईड पथकाने केली मंदिर परिसराची स्वच्छता




चोपडादि.०३(प्रतिनिधी): चोपडा शहरातील जुन्या शिरपूर रस्त्यावरील श्री हरेश्वर मंदिर हे प्रसिद्ध मंदिर असून येथे श्रावण महिन्यात सोमवारी मोठी यात्रा भरत असते. तालुकाभरातून मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या संख्येने दर सोमवारी येथे येत असतात. या ठिकाणी श्रावणी सोमवार निमित्त भक्तांची प्रचंड गर्दी असते.         

  यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध खाद्य पदार्थांची दुकाने व इतर दुकाने थाटली जाताय. त्यामुळे मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांकडून अनावश्यक वस्तू टाकल्या जाऊन  कचरा जमा होतो. शहरातील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी मधील छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट विद्यार्थ्यांनी व सावित्रीबाई फुले गाईड युनिटमधील विद्यार्थिनींनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. नारळाच्या कुंची व करवंट्या, केर कचरा ,रॅपर, प्लॅस्टिक पिशव्या, कागद गोळा करून तो जाळला व झाडूच्या सहाय्याने पूर्ण परिसर स्वच्छ केला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह व आनंद दिसून आला. या कामी स्काऊट मास्टर एस. बी. पाटील व मुख्याध्यापक एस.डी. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. मंदिर परिसरातील भक्तांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने