आकाशात भरारी घ्या परंतु आई - वडिलांना विसरू नका -PSI घनःशाम तांबेचे चोपडा रोटरी गुणवंत विद्यार्थी सन्मान प्रसंगी आवाहन
चोपडा,दि.02( प्रतिनिधी)आज तुम्ही उत्तम गुण प्राप्त केल्याने तुमचा सन्मान होतोय.. या मागे तुमच्या आई - वडिलांचे कष्ट, गुरूजनांचे मार्गदर्शन आहे याची जाणीव राहू देत ध्येय ठरवा व जिद्दीने यापुढे आकाशात भरारी घ्या, परंतु आई -वडिलांना कधीही विसरू नका असे आवाहन चोपडा रोटरीतर्फे गुणवंतांचा सन्मान करतांना चोपडा पोलिस स्टेशनचे PSI घन: श्याम तांबे यांनी केले. यावेळी त्यांनी मला स्वतःला इ.१०वीला कमी मार्क्स असतांना त्यानंतर मी जिद्दिने अभ्यास करत इ.१२वी,D.Ed. व M.P.S.C. परीक्षेचा अभ्यास करतांना उपसलेले कष्ट याचे जिवंत अनुभव सांगत सहज साध्या शब्दांत आपल्या राज्य सेवास्पर्धा परीक्षेतील यशाची प्रेरणादायी वाटचाल सांगितली. या चोपडा रोटरीच्या गुणवंत सन्मान सोहळ्यात शहरातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातून इ.१oवी व१२वी ला प्रथम आलेल्या गुणवंतांना तसेच रोटरी परिवारातील गुणवंत पाल्यांना रोटरीचे सन्मानपत्र व भेटवस्तू देवून प्रमुख अतिथी PSI घनःशाम तांबेच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नगर वाचन मंदिर गांधी चौक येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक चोपडा रोटरी क्लब प्रेसिडेंट रोटे. अॅड. रुपेश पाटील यांनी केले. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथींसह चोपडा रोटरीचे मानद सचिव रोटे. गौरव महाले, प्रकल्प प्रमुख रोटे. मुख्या. विलास पं. पाटील सर,प्रकल्प सहप्रमुख रोटे. भालचंद्र पवारसर तर सोहळ्यासाठी रोटरीचे सहप्रांतपाल रोटे. नितीन अहिरराव, ज्येष्ठ रोटे.एम. डब्ल्यू. पाटील तसेच चोपडा रोटरीचे सदस्य , गुणवंत पाल्यांचे पालक उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन रोटे. मुख्या.डॉ.जगदिश महाजन व रोटे. महेंद्र बोरसे सर यांनी केले.
