ओमसाई लॉन्स येथे जिल्हा भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व माजी नगरसेवक सुरज देसले यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
*शिंदखेडा दि.19(प्रतिनिधी): येथे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2021- 22 च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ओमसाई लॉन्स येथे संपन्न झाला धुळे जिल्हा भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व माजी नगरसेवक सुरज देसले यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..*
यात भावेश दिनेश चौधरी , यथार्थ योगेश देसले , भावेश दिपकसिंग गिरासे , तनुजा चुडामण पाटिल , वरूण अरुण मोरे , पियुष सुनील माळी , उत्कर्ष शरद महाले , मृणाली नरेंद्र देवरे , श्रुती प्रवीण गिरासे , मेहुल किरण बडगुजर , तारुल गणेश नागरगोजे , रोंजल राहुल पवार या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शिंदखेडा नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरज देसले , चुडामण पाटील , प्रवीण बैसाणे , भैय्या चौधरी , संजय महाजन , रणजित गिरासे , योगेश देसले सर , विजय मोरे , योगेश देसले , डॉ.सुमित गिरासे , अमरदिप गिरासे , शरद महाले , दिपकसिंग गिरासे , डॉ.नरेंद्र देवरे , प्रवीण गिरासे , अभिजित गोसावी , गणेश नागरगोजे , राहुल पवार यासह पालक , विद्यार्थी , भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.