*सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील आदिवासी कोळी समाज जातीचें प्रमाणपत्र अभावी वंचित*.. आदिवासी कोळी समाज समन्वय समिती तर्फे निवेदन
सिल्लोड-सोयगाव दि.१९ :संविधानिक हक्क राहुन पण सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील "टोकरे, महादेव,मल्हार" अनुसूचित जाती चे दाखले देण्यास, अधिकारी व कर्मचारी हे हेतू पुरस्कार टाळाटाळ करत आहेत यामुळे अनुसूचित जाती चे विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूर, मोलमजुरी,टोकरे, महादेव,मल्हार,इ.उमेदवारांना शिक्षण कामी व प्रगती करता वंचित राहावे लागत आहे, आपल्या कार्यालयात असंख्य अनुसूचित जमाती चे दाखले प्रस्ताव प्रलंबित स्थीतीत आहेत. त्या अर्जदाराने केलेल्या मागणीचा पुराव्यांचा सुबुद्धी ने विचार करून त्यांचा "नैसर्गिक न्याय हक्काचा" व त्यांना मल्हार, महादेव,टोकरी कोळीचे अनुसूचित जमाती चे दाखले त्वरीत देण्यात यावे, सगळे प्रलंबित घटनेवर आपण कारवाई केल्यास अथवा निकाली न काढल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल.आणि सुशिक्षित बेरोजगार शेतमजूर मोलमजुर हे आदिवासी विकासाच्या जातीचे प्रमाणपत्र अभावी वंचित..,यांची जबाबदारी ही प्रशासनाची राहिलं.
वरील प्रमाणे ७ दिवसांमध्ये निकाल न घेतल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड, सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील मल्हार,टोकरे, महादेव, अनुसूचित जाती चे समाज बांधव तसेच आम्ही दि.२५/०७/२०२२ सोमवारी सकाळी १०:३० वाजता आपल्या कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण,धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड आदिवासी कोळी समाज समन्वय तर्फे श्री.सखाराम बि-डाडे अध्यक्ष, मराठवाडा विभाग, श्री आनंदा इंगळे सर मराठवाडा उपाध्यक्ष,श्री.पांडुरंग साळवे, श्री विजेंद्र इंगळे युवा अध्यक्ष औरंगाबाद,श्री गणेश तायडे,अध्यक्ष सिल्लोड तालुका विष्णु भोटकर युवा जिल्हाकार्याध्यक्ष औरंगाबाद, श्री कैलास गवळी युवा अध्यक्ष ता.सिल्लोड,श्री.दिपकजी सोनवणे समन्वयक सोयगाव तालुका, श्री गोपाल इंगळे युवा अध्यक्ष सोयगाव, श्री दिपक सपकाळ उपजिल्हाध्यक्ष, श्री राजु सपकाळ(लेनापुर) उपाध्यक्ष सोयगाव इ.निवेदनावर पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.