घुमावल गावी नेमने मारुती मंदिर परिसरात वृक्ष लागवड

 



घुमावल गावी नेमने मारुती मंदिर परिसरात वृक्ष लागवड

चोपडा दि.19(प्रतिनिधी):चोपडा तालुक्यातील घुमावल गावी नुकताच जिर्णोद्धार झालेल्या मारुती मंदिर परिसरात पावसाळ्याचे औचित्य साधत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला. 

दि.१८/०७/२०२२ रोजी नेमने मारुती मंदिर घुमावल येथे वरुणराजाच्या सरींची सरबत्ती पाहत गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या शरद हस्ते निम, कन्हेर व पाम चे झाडें लावण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिक  रमेश नाना पाटील (माजी पोलिस गोरगावले बु), पाटील वसंत बापु ,डॉ एकनाथ पाटील ,राजेंद्र पाटील, घुमावल चे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, जयवंत पाटील, तुकाराम दादा समस्त गोरगावले व घुमावल आणि खडगाव चे ग्रामस्थ उपस्थित होते.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने