*चोपडा तालुक्यातील १२ पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत जाहीर..अनुसूचित जमाती साठी ५ तर सर्व साधारण प्रवर्गासाठी ६राखीव..चुंचाळे गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित...*राजकिय उलथापालथ होण्याचे संकेत.. प्रस्थापितांना धक्का..!* वाचा..!कोणत्या गणात किती गावे, किती ग्रामपंचायती, गणाची एकुण लोकसंख्या, अनुसूचित जाती, जमाती संख्या
चोपडा दि.28(प्रतिनिधी )* चोपडा तालुक्यातील 12 पंचायत समिती गणातील आरक्षण सोडत नुकतेच जाहीर करण्यात आले असून त्यात 6 सर्व साधारण राखीव झाले आहेत त्यात 2 गण महिलांसाठी राखीव आहेत.तर अनुसूचित जमाती साठी 5 गण राखीव आरक्षित करण्यात आले आहेत त्यातील 3 गण महिलांसाठी राखीव आहेत.तसेच चुंचाळे हा एकमेव गण अनुसूचित जाती महिला राखीव झाला आहे. एकंदरीत राजकिय प्रस्थापितांना जबर धक्का बसला असून त्यांना नवीन गटाची शोधाशोध करावी लागणार असल्याने अनेकांची गोची झाली आहे.
*चोपडा पंचायत समिती आरक्षण गण पुढीलप्रमाणे*
*चुंचाळे* - अनुसुचित जाती (महिला)
*धानोरा प्र -* अनुसुचित जमाती
*अडावद* - अनुसुचित जमाती
*गोरगांवले बु. -* अनुसुचित जमाती ( महिला)
*वर्डी* - अनुसुचित जमाती ( महिला)
*घोडगांव -* अनुसुचित जमाती ( महिला)
*चहार्डी* - सर्वसाधारण प्रवर्ग
*अकुलखेडा* - सर्वसाधारण प्रवर्ग
*विरवाडे -* सर्वसाधारण प्रवर्ग
*लासुर* - सर्वसाधारण प्रवर्ग
*कुरुवेल -* सर्वसाधारण प्रवर्ग ( महिला)
*नागलवाडी -* सर्वसाधारण प्रवर्ग ( महिला)
चोपडा तालुक्यातील १२ गणांची सविस्तर माहिती अशी, कोणत्या गणात किती गावे, किती ग्रामपंचायती, २०११च्या जनगणनेनुसार गणातील एकुण लोक संख्या, अनुसूचित जाती लोकसंख्या, अनुसूचित जमाती लोक संख्या शासकीय पत्रकानुसार पुढीलप्रमाणे
1. *नागलवाडी गण* *_(सर्व साधारण महिला):_* नागलवाडी गणात ८ ग्रामपंचायतींचा समावेश असून 15 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 22204 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 775 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 14,849 इतकी आहे.हा गण सर्व साधारण महिला राखीव आरक्षण झाले आहे.
2. *विरवाडे गण* *_(सर्व साधारण ):_* विरवाडे गणात ५ ग्रामपंचायतींचा समावेश असून ९ गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण १८०१५ ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती ३२७ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 14,425 इतकी आहे.हा गण सर्व साधारण राखीव आरक्षण झाले आहे.
3. *धानोरा प्र.अ. गण* *_(अनुसूचित जमाती ):_* धानोरा प्र.अ. गणात 7 ग्रामपंचायतींचा समावेश असून 15 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 22794 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1587 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 10272 इतकी आहे.हा गण अनुसूचित जमाती राखीव आरक्षण झाले आहे.
4. *अडावद गण* *_(अनुसूचित जमाती ):_* अडावद गणात 1 ग्रामपंचायतींचा समावेश असून 1 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 24387 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 955 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 6287इतकी आहे.हा गण अनुसूचित जमाती राखीव आरक्षण झाले आहे.
5. *चुंचाळे गण* *_(अनुसूचित जाती महिला ):_* चुंचाळे गणात 7 ग्रामपंचायतींचा समावेश असून 11 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 19760 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1739 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5619 इतकी आहे.हा गण अनुसूचित जाती महिला राखीव आरक्षण झाले आहे.
6. *अकुलखेडा गण* *_(सर्व साधारण ):_* अकुलखेडा गणात 10 ग्रामपंचायतींचा समावेश असून 11 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 18565 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1546 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 4700 इतकी आहे.हा गण सर्व साधारण राखीव आरक्षण झाले आहे.
7. *लासुर गण* *_(सर्व साधारण ):_* लासुर गणात 4 ग्रामपंचायतींचा समावेश असून 7 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 17015 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 981 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5077 इतकी आहे.हा गण सर्व साधारण राखीव आरक्षण झाले आहे.
8. *घोडगाव गण* *_(अनुसूचित जमाती महिला):_* घोडगाव गणात 11 ग्रामपंचायतींचा समावेश असून 12 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 18819 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1306 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5940इतकी आहे.हा गण अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण झाले आहे.
9. *चहार्डी गण* *_(सर्व साधारण ):_* चहार्डी गणात 6 ग्रामपंचायतींचा समावेश असून 8 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 18067 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1638 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3241 इतकी आहे.हा गण सर्व साधारण राखीव आरक्षण झाले आहे.
10. *कुरवेल गण* *_(सर्व साधारण महिला):_* कुरवेल गणात 10 ग्रामपंचायतींचा समावेश असून 10 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 18166 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1563 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5628 इतकी आहे.हा गण सर्व साधारण महिला राखीव आरक्षण झाले आहे.
11. *गोरगावले बु .गण* *(अनुसूचित जमाती महिला):_* गोरगावले बु. गणात 10 ग्रामपंचायतींचा समावेश असून 13 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 20501 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1587 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 8594इतकी आहे.हा गण अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण झाले आहे.
12. *वर्डी गण* *_(अनुसूचित जमाती महिला):_* वर्डी गणात 11 ग्रामपंचायतींचा समावेश असून 12 गावे आहेत २०११च्या जनगणनेनुसार एकुण 21769 ईतकी लोकं संख्या आहे.त्यात अनुसूचित जाती 1667 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 6041इतकी आहे.हा गण अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण झाले आहे.