पाचोरा आगारातील फलकांवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर नाव दुरुस्ती करण्याचीआर्यन युवा फाउंडेशनची मागणी

 




पाचोरा आगारातील फलकांवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती  संभाजी नगर  नाव दुरुस्ती  करण्याचीआर्यन युवा फाउंडेशनची मागणी

पाचोरा दि.२८( प्रतिनिधी राजेंद्र खैरनार):पाचोरा बस स्थानकावरील औरंगाबाद नामफलक हटवून छ. संभाजी नगर नावाचे दुरुस्ती फलक ताबडतोब करावे अशी मागणी आर्यन युवा फाउंडेशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे 
पाचोरा आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे

सध्या महाराष्ट्र राज्यात नविन सरकार स्थापन झाले असुन महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करून त्याचं छ.संभाजी नगर करण्यात आले आहे. सरकारने हा निर्णय घेऊन आज एक आठवडा पूर्ण झालेला आहे तरीही  पाचोरा बस स्थानकावरचे औरंगाबाद नावाचे नाम फलकाचे नाव बदलले नाही तरी लवकरात लवकर पाचोरा ते औरंगाबाद तसेच बस स्थानकातील विविध ठिकाणी असलेले औरंगाबाद नाव हे काढुन छ. संभाजी नगर चे नामफलक तात्काळ बदलवुन महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन तात्काळ छत्रपती संभाजी महाराज्यांचे प्रत्येक फलकावर नाव लावण्यात यावे असे  आर्यन युवा फाऊंडेशन म्हटलं आहे.निवेदनप्रसंगी
आनंद प्रकाश शिंदे,सचीव
अशोक भाऊ मोरे, गोरख सुर्यवंशी,विशाल शेजवळ,अनिल हटकर, ऋषीकेश कोळी, आकाश पाटिल,पवन शिंदे, रोहिदास गायकवाड,योगेश कुंभार आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने