महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची २६ ला मंगळग्रह मंदिरावर आमसभा
चोपडा दि.२५ (प्रतिनिधी)*महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा जळगाव ची आम सभा..* केंद्रीय कार्यकारणीचे अध्यक्ष शिवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुरुषोत्तम वैष्णव राज्य कोषध्यक्ष मा मेधा चंदणकर राज्य कार्याध्यक्ष, मा वसंत बैसाणे,अजय चौधरी, सुशील सोनवणे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे..*
*सदर बैठक दिनांक-26 जुन 2022* रविवार रोजी वेळ- सकाळी 11वाजता "श्री.मंगळग्रह मंदिर"* अमळनेरच्या *जागतिक देवस्थान* येथे ठेवण्यात आलेला . बैठकीनंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे.