गुगलच्या माध्यमातून आदिवासी तरुणाने साधला चोपडा रोटरीशी संपर्क...चोपडा रोटरीने सोडवला अंमलवाडी आदिवासी गावाचा पाण्याच्या प्रश्न...






 गुगलच्या माध्यमातून आदिवासी तरुणाने साधला चोपडा रोटरीशी संपर्क...चोपडा रोटरीने सोडवला अंमलवाडी आदिवासी गावाचा पाण्याच्या प्रश्न...

 चोपडा दि.२५ (प्रतिनिधी) :--  तालुक्यातील आदिवासी गाव अंमलवाडी व परिसरातील पाडे भागात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अंमलवाडी गाव व पाड्यात राहणाऱ्या आदिवासी रहिवाशांना भर पावसात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आदिवासी पाड्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यात  वारंवार व नेहमी भेडसावणारा प्रश्‍न असतो तो म्हणजे पाण्याच्या. गावात पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. यात बोअरिंग फक्त अर्धा तास चालते त्यामुळे गावकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही ,गावकऱ्यांची तहान भागत नाही, ग्रामस्थांना थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते ,गावात पाण्याच्या एक हपका आहे पण त्याद्वारे येणारे पाणी दूषित असल्याने ते पाणी पिण्यास योग्य नाही या सर्व बाबींचा विचार गावातील आदिवासी तरुण केदार बारेला करतो व पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात कशी करता येईल यावर विचार करतो.

    सदर पाण्याचा प्रश्न राजकारण्यांच्या माध्यमातून मार्गी लागणार नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने काही एनजीओशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला .शेवटी अंमलवाडी येथील तरुण केदार बारेला याने गुगलच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष कोण आहेत ? हे सर्च केले. गुगलच्या माध्यमातून रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांचा  संपर्क नंबर मिळवला व सदर युवकाने रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांचेशी  भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून भेटण्याची वेळ मागीतली व प्रत्यक्ष भेटीत आपल्या अंमलवाडी आदिवासी गावातील पाण्याची भीषण समस्या कथन केली व मदत करण्याचे आवाहन देखील केले.

    सदर युवकाची गावाबद्दल व  पाण्याबद्दल असलेली धडपड व  तळमळ पाहून सदर युवकाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांनी अंमलवाडी गावात पाण्यासाठी तातडीने बोअरवेल करून दिली.

    रोटरी क्लब ऑफ चोपडाने अंमलवाडी आदिवासी गावात पाण्यासाठी तातडीने बोअरवेल करून  दिल्याने आदिवासी तरुण केदार बारेला व गावकऱ्यांनी रोटरी क्लब ऑफ चोपडा या सेवाभावी संस्थेचे विशेष आभार मानले आहेत.

                      *चौकट*

आदिवासी भागात नद्या , नाले वाहतात तरीही येथील आदिवासींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे .पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे .पिण्याला पाणी नाही तर शेतीला कोठून मिळेल अशी भयावह परिस्थिती तालुक्यातील अंमलवाडी आदिवासी भागात पाहावयास मिळत आहे. नद्यांचे व ओहोळाचे  पाणी अडविणे , मोठ्या प्रमाणात बंधारे बांधून पाणी जिरवणे अशा स्वरूपाच्या योजना लक्षात घेऊन त्या राबवण्याची गरज असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांनी व्यक्त केले.

     सदर बोअरवेल करणे प्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले , सचिव प्रवीण मिस्त्री , प्रकल्प प्रमुख विपुल छाजेड , सह प्रकल्प प्रमुख भालचंद्र पवार ,आदिवासी तरुण केदार बारेला व ग्रामस्थ उपस्थित होते.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने