*श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्र महाविद्यालय येथे योगदिन साजरा*
चोपडा दि.२१(प्रतिनिधी):जागतिक योग दिनाच्या निमित्ताने श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्र महाविद्यालय येथे योग दिन 21 जून रोजी सकाळी 7 वाजता महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
कोरोना काळात 2 वर्षे शाळा महाविद्यालयाचे वर्ग ऑनलाइन भरत असल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम साजरे होत नव्हते आता कोरोना चा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर महाविद्यालय विद्यार्थी उत्साहात योग दिन साजरा केला. आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा मध्ये योग योगासने योग साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून ऋषी मुनी साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व त्याचे फायदे आणि त्यांची गरज पटवून दिलेले आहे आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो तन आणि मन यांना एकत्रित व्यायाम म्हणजे योग असे म्हणता येईल योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधनसामग्रीची आवश्यकता नसते सहज सोपा कुठेही कधीही करता येण्याजोगा व्यायाम म्हणजे योगा होय योगसाधनेमुळे शरीर व मन स्वस्थ लाभते यामुळे आज जगभरात योगाचे महत्त्व वाढत आहे जगभरातील विविध देशांमध्ये योगा दिन साजरा केला जातोय आणि भारत हे याचे प्रमुख केंद्र मानले जात आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे उद्घाटक अँड भैय्यासाहेब संदीप पाटील यांनी केले.
दररोज योगा केल्याने शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम, शरीर, शरीराला मिळणारी ऊर्जा, स्नायूंची वाढणारी ताकद आणि मन शांत करण्यासाठी योगा कसा फायदेशीर आहे याबाबत प्राचार्य श्री डॉ गौतम वडनेरे यांनी विध्यार्थांना प्रेरणा दिली, तसेच योग दिन योगाचे विविध प्रकारचे प्रात्यक्षिकांसह माहिती देऊन सर्वांकडून योगासनं करून घेतली यामध्ये त्रिकोणासन वृक्षासन ताडासन बैठक स्थितीतील शवासन अर्धचंद्रासन भुजंगासन धनुरासन शलभासन हलासन नौकासन अशी विविध प्रकारची योगासने आणि प्राणायाम घेण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री अँड संदीप पाटील सचिव डॉ स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य प्रबंधक व योग शिक्षक प्रा अतुल साबे तसेच सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.