विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत गरजाही तितक्याच महत्वाच्या..रोटे.अध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले* .. अनवर्दे बुधगाव जि.प. शाळेत चोपडा रोटरी क्लब तर्फे" हॅन्डवॉश स्टेशन"ची मदत*
चोपडा दि.२१(प्रतिनिधी)शहरी भागातील शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांचेही रुप बदलायला जोमाने सुरुवात झाली आहे.विद्यार्थ्यांच्या सुख सुविधांसाठी गावकरीही पुढे सरसावले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचे अद्ययावत रुप बघावयास मिळत आहे आम्हीही रोटरी क्लबच्या माध्यमातून गरजू शाळेसह विद्यार्थ्यांचे भवितव्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नुसते शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांच्या गरजाही तितक्याच महत्वाच्या असल्याचे हेरुन आम्ही तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ चोपडा चे अध्यक्ष रोटे.भैय्यासाहेब पंकज बोरोले यांनी येथे केले.
ते रोटरी क्लब ऑफ चोपडा मार्फत देण्यात आलेल्या हॅन्डवॉश स्टेशनचे उद्घाटनप्रसंगी अनवर्दे- बुधगाव जि.प.शाळेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,रोटरी क्लब देशात २२२ शहरांमध्ये जोमाने समाज कार्य करीत असून शहरा पाठोपाठ खेड्यात ही शैक्षणिक गरजा सोबत मुलभूत सुविधा मिळाव्यात हे लक्षात घेऊन जि.प. शाळांच्या मदतीला रोटरी क्लब धावते आहे.त्यासाठी गावातील लक्ष घालणाऱ्यांची संख्या वाढणे आवश्यक असल्याचे मत नोंदवत शाळेच्या व्यवस्थापन अध्यक्ष कैलास शिरसाठ यांचे कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास रोटे.प्रवीणजी मिस्त्री,रोटे.एम.डब्लू.पाटील, रोटे.अविनाश पाटील, शाळां व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास पांडुरंग शिरसाठ, उपाध्यक्ष सचिन साळुंखे,लक्ष्मण शिरसाठ, गजानन शिरसाठ, मुख्या.वासुदेव नन्नवरे, पांडुरंग महाजन, लक्ष्मीकांत पाटील, श्रीमती सुचिता सैंदाणे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक योगेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गणेश सूर्यवंशी यांनी केले.