पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे योग दिवस उत्साहात साजरा*

 




*पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे योग दिवस उत्साहात साजरा*

चोपडा( प्रतिनिधी) :-- पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था चोपडा संचलित , पंकज इंग्लिश मीडियम स्कूल,चोपडा येथे २१ जून रोजी  मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व योग प्रशिक्षक दीपक पाटील (जळगाव ) सौ.जयश्री पाटील (चोपडा ) ,सौ. कीर्ती महाजन (चोपडा ) यांनी योग व प्राणायामची प्रात्यक्षिके घेतली.त्यांनी  विद्यार्थ्यांना  योग्य व सोप्या पद्धतीने योगा शिकविला .

        कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य संदीप वन्नेरे  यांनी  स्वागत केले. सूत्रसंचालन किशोर  पाचवणे  यांनी केले तर योगाचे महत्त्व गणेश साळुंखे  यांनी विशद केले.

      कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.रंजना  तायडे , नितीन बाविस्कर  प्रतिक चौधरी  , सौ.अनिता पाटील ,सौ.शितल भावसार,सौ भादले , कु.वर्षा पाटील , बाळासाहेब पाटील व सुलभा पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने