*बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात योग दिवस साजरा*
चोपडा दि.२१(प्रतिनिधी): आज दिनांक 21 जुन 2022 रोजी शासन परिपत्रकप्रमाणे बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात प. पू.साने गुरुजी आदर्श बालवाडी,बालमोहन प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व लिटल हार्ट इंग्लिश मेडियम स्कूल च्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील निवृत्त क्रीडा शिक्षक प्रा. डॉ.सुधीर चौधरी उपस्थित होते. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री रविंद्र साळुंखे यांनी विविध योगासन,प्राणायाम ,शरीराच्या मुक्त हालचाली यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. योग ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,योगासनांचे जीवनात महत्त्व,योगासनांचे फायदे, प्राणायाम व योगासने करण्यासाठी काय करावे, नंतर आहार कसा असावा इ.मार्गदर्शन अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ.सुधीर चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाला बालमोहन विद्यालयाचे व्यवस्थापक दिवाकर नाथ, प.पू.साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा नेवे,बालमोहन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, लिटल हार्ट इंग्लिश मेडियम स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. उत्कर्षा जोशी, लिटल हार्ट इंग्लिश मेडीयम सेकंडरी स्कूलचे प्रिन्सिपल खैरनार तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सूत्रसंचालन कैलास बबन पाटील तर आभार चंद्रकांत मंगल पाटील यांनी मानले