*चामुंडा माता समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
चोपडा दि.२१:-(प्रतिनिधी)-------- कोविड नंतर प्रत्यक्ष परीक्षा व घरची बेताचीच परिस्थिती अशा आव्हानात्मक स्थितीत विटनेर येथील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश खूप दैदिप्यमान आहे आणि त्याच्या या यशाचे कौतुक झालंच पाहिजे या भावनेतून
तालुक्यातील विटनेर येथील चामुंडा माता मंदिर समितीच्या वतीने यंदा २०२२साली इयत्ता१०व १२वी च्या उत्तीर्ण झालेल्या गावातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.
गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण करून गावातील विद्यार्थी हे आजूबाजूच्या गावाला तसेच चोपडा येथे पुढील शिक्षणासाठी जात असतात. त्यांना प्रेरणा मिळावी भविष्यात त्यांनी पुढील काळात चांगले शिक्षण घेऊन गावाचे नाव उंचवावे हा हेतू चामुंडा माता मंदिर समितीचा आहे.
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना समितीच्या वतीने पेढा भरवून ,गुलाब पुष्प आणि शालेयपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यावेळी मंदिराचे सर्वच विश्वस्थ व ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या गुणवंत पाल्याचा गौरव करण्यात आल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.