बालमोहन विद्यालयाचे उज्ज्वल यशाची परंपरा कायम; तन्वी आणि पूजा पाटील प्रथम
चोपडा दि.18:-(प्रतिनिधी)----शहरातील सामाजिक व शैक्षणिक अमर संस्था संचलित बालमोहन माध्यमिक विद्यालय येथील इयत्ता १० वी मार्च २०२२ चा १०० टक्के निकाल यंदा देखील लागला आहे..यात विद्यार्थिनींनी नेत्रदिपक यश मिळवले आहे.
शाळेत यंदा १०वी साठी एकूण ७६विद्यार्थी प्रविष्ट होते.यातील सर्वच विद्यार्थी भरघोस गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.त्यात प्रथम क्रमांक तन्वी चंपालाल पाटील व पूजा रामलाल पाटील ८९%प्राप्त केले आहेत ,दुतीय क्रमांक ठाकरे हर्षल किशोर गुण ८७.२०% ,तृतीय श्रद्धा संदीप वाणी गुण ८६.८०% ,चतुर्थ रत्नदीप संजय पाटील गुण ८५.२०% व पाचवा क्रमांक हर्षल प्रशांत महाजन ८४.६०%. गुणवत्ता धारक उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष मनोज चित्रकथी,सचिव दीपक जोशी व्यवस्थापक दिवाकर नाथ,मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
कोविड नंतर झालेल्या प्रत्यक्ष परीक्षा आणि त्या परिस्थितीत सामोरे गेलेले विद्यार्थी यांच्या यशाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे दैदीप्यमान आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करतो.अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली...