*सी.बी निकुंभ विद्यालयाच्या निकालात मुलींचीच बाजी
*
चोपडा दि.१८ ( प्रतिनिधी )- तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी निकुंभ माध्य. उच्च माध्य. विद्यालयाचा इ. १०वी परीक्षेचा निकाल ९२.६३% लागला.या परीक्षेत प्रविष्ट ९५ विद्यार्थ्यांपैकी ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष बाब अशी की विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी कु. जयश्री विलास साळुंखे व कु. नंदिनी डिगंबर पाटील ९१.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. द्वितीय क्रमांक कु. हर्षदा सुनील पाटील ९१.२०%, तृतीय क्रमांक कु. मेहकबी शकील पिंजारी ९१% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन,संचालक म॔डळ, मुख्याध्यापक आर. पी.चौधरी,पर्यवेक्षक व्हि.ए. नागपुरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.