चोपड्यात दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या..१२ तोळे सोन्यासह लाखोंची रक्कम पोबारा..त्र्यंबक नगर व सहकार कॉलनीतील घटना*
चोपड़ा दि.३० (प्रतिनिधी): शहरातील त्र्यंबक नगर व सहकार कॉलनी या दोन ठिकाणी भर दिवसा अज्ञात चोरट्यानी बंद घरे फोडली असून दोन्ही घरातून १२ तोळे सोने व अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, त्र्यंबक नगर भागातील रहिवासी संतोष सोनवणे यांच्या घरात दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल ५ तोळे सोने व ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. त्यांची मुलगी डिलिवरी झाली असल्याने त्यांनी कालच दीड लाख रुपयांचे कर्ज सोसायटीच्या माध्यमातून घेतले होते. तर थोड्या वेळाने दोन वाजेच्या सुमारास अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावरील सहकार कॉलनीतील रहिवासी कैलास रामदास वाघ यांचे बंद घराचे कुलूप तोडून तसेच कपाटाचे कुलूप तोडून ७ तोळे सोने व १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. एकाच दिवशी भर दिवसा दोन घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे चोर पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.सदर घटनास्थळी श्वान पथकास खास पाचारण करण्यात आले असून पो. ना. पी पी कंखरे हे श्वानच्या मदतीने चोर पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर घटनास्थळी ठसे तज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले असून एपीआय व्ही के कांबळे व पो. कॉ सचिन चौधरी हे प्रयत्नशील आहेत. सदर घटनेच्या अधिक तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विलेश सोनवणे, संतोष चव्हाण संतोष, संतोष पारधी, शेषराव तोरे आदी करीत आहेत...