विकसित भागात रस्ते,गटारी बांधकाम करण्याची मागणी

 

विकसित भागात रस्ते,गटारी बांधकाम करण्याची मागणी


यावल दि.1(सुरेश पाटील) यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रातील आयेशा नगर,तिरुपतीनगर,गंगानगर, गणपतीनगर,वासुदेव नगर परिसरात रस्ते आणि गटारीचे बांधकाम तात्काळ करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

        यावल न.पा. मुख्याधिकारी यांच्याकडे दि.30 जून 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वार्ड क्र.3 मध्ये गेल्या 4 ते 5 वर्षां पासुन आम्ही वारंवार

लेखी अर्ज नगर पालिकेला सादर केले आहे.नगरपालिकेतर्फे ज्या ठेकेदाराने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम केले त्यामुळे संपूर्ण रस्त्यांचे बारा वाजलेले आहेत आज पर्यंत आयशानगर रस्त्याचे व गटारीचे मधील काम

झालेले नाहीत तसेच गंगानगर, गणपतीनगर,महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर येथे

रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था  झालेली आहे.तिरुपतीनगर नवीन

वसाहती मध्ये रस्त्याचे व गटारीचे काम झालेच नाही व ज्या भागात कामे झालेले आहे

ते काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे याच्यासाठी गेल्या वर्षी उपोषण सुध्दा केले गेले होते.

उपोषणावर बसलेले सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अशपाक शाह यांना माजी नगराध्यक्षा

नौशाद मुबारक तडवी यांनी लेखी आश्वासन दिले होते व उपोषण सोडले होते पण रस्त्याच्या

कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही आणि आता पावसाळ्यामुळे रहिवाशी  नागरीकांना ये–जा करणारे नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.तसेच शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा याच समस्यांचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.आयशा मस्जिद जवळ नाल्याची सफाई सुध्दा

होत नाही.आणि पाऊस पडल्यावर हा नाला ब्लॉक हाऊन जातो.नाल्यातील जीवजंतू

किटानु व जनावर बाहेर निघत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी आपण तात्काळ रस्ते गटारी बांधकामाची कार्यवाही करावी अशी मागणी

करण्यात आली असून तात्काळ कार्यवाही न झाल्यास यावल नगर पालिके समोर ठिय्या

आदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा मोहम्मद अशपाक शहा,शेख सलीम,अजित पटेल शेख सईद,शोहब पटेल,रेहान खान,समीर खान,शेख युनुस, साजिद खान बिस्मिल्ला खान, शेख सलीम,शफीउल्ला खान, अन्सार खान निसार खान, अल्ताफ मणियार,वाजिद कुरेशी इत्यादी नागरिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तक्रार अर्जावर स्वाक्षरी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने