भडगाव तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष पेरणी करून बीबीएफ पेरणी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक उत्साहात
भडगाव दि.३० ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत दिनांक 25 जून ते 1 जुलै 2022 दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह चे आयोजन करण्यात येत असून सदर सप्ताहानिमित्त तालुक्यातील विविध गावांत कृषीविषयक विविध योजना, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू आहे सदर सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान प्रचार, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम तसेच कृषिक ऍप वापरणे बाबत जनजागृती त्याच बरोबर जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर,पाच टक्के निंबोळी अर्क तयार करणे बाबत प्रात्यक्षिके तसेच विविध खतांच्या ग्रेड घरच्या घरी तयार करणे बाबत माहिती आदी विविध विषयांवर कृषी विभागामार्फत प्रचार प्रसिद्धी सुरू आहे सदर मोहिमेचाच एक भाग म्हणून कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त 29 जून 2022 रोजी प्रगतीशील शेतकरी संवाद दिनानिमित्त तालुका सिड फार्म मौजे टोणगाव ता भडगाव येथे प्रगतिशील शेतकरी विनोद पाटील यांना निमंत्रित करून शेतकऱ्यांशी सवांद व शेतकर्यांना सिड् ड्रम द्वारे बीज प्रक्रिया व बीबीएफ तंत्रज्ञान पेरणी करून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले सदर वेळी उपविभागीय कृषी अधिकारी एन.व्ही.नाईनवाड, तालुका कृषी अधिकारी बी.बी. गोरडे, इफकोचे केशव शिंदे व कृभको चे रवि खुपसे,पंचायत समिती कृषी अधिकारी दीपक निकुंभ व देशमुख, मंडळ कृषि अधिकारी एसटी पाटील आदींचे विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम करणेसाठी संपूर्ण नियोजन कृषी कार्यालयातील कर्मचारी यांनी यशस्वी प्रयत्न केले
तालुक्यात पुरेशा प्रमाणात पर्जन्यमान झाले असून पेरणीसाठी 75 ते 100 मिलिमीटर पावसाची आवश्यकता असते त्यानुसार भडगाव तालुक्यात पेरणीस योग्य पर्जन्य झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणे,पेरणी करताना बीएफ यंत्राचा वापर करणे तसेच बियाणे खरेदी वेळी पक्के बील घेऊनच अधिकृत परवानाधारक मान्यता प्राप्त कृषी केंद्रा वरूनच बियाणे खरेदी करूनच पेरणी करणे बाबत तालुका कृषी अधिकारी श्री.बी.बी.गोरडे यांच्या तर्फे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.