*दृढ़तेची प्रतिमा-महासाध्वी सरिताश्री जी*
१जून २०१३ ला आमच्या गुरुणि महाराज पूज्य सरिताश्रीजी महाराज यांचे अपघाता मुले आकस्मिक देवलोक गमन झाले .आज त्यांची १०वी पुण्यतिथी आहे.
खानदेश मधल्या शिरपुर तालुक्यातील वेलोदा नावाच्या लहानश्या गावात त्यांचे जन्म झाले . वडिल घेवरचंदजी आणि आई पिस्ताबाई यांनी तिला सरिता नाव दिले.सरिता बालपनापासुन स्वभावने सगल्याना जीव लावनारी होती. वयाच्या १०व्या वर्षी ह्रद्याचे ऑपरेशन झाले होते. हलु हलु ती स्वस्थ होत होती .तिच्या जागेवर कूणी दुसर असल असत तर तो निराश झाला असता जीवनाच्या वाटेवर अशक्त राहिला असता. पण सरिता दृढ़ आत्मबलाने सशक्त संकल्प शक्तिमुले पावलो न पावलो पुढे निघाली कुटुम्बा तील सगल्या व्यक्तिंचा प्रेम, सहवास ,सहकारिता तिला खूप मिलाल. सरिताला लहानपनापासुन धर्म ,कर्म, सत्संग करायची आवड़ होती.सादगी मय जीवन तिला फारआवडायच. वयाच्या २०व्या वर्षी तिला सद्गुरूचे दर्शन झाले .नवकार साधक परम पूज्य गुरुदेव श्री विचक्षण मुनिजी यांचे पहिल्यांदा दर्शन घेतले. भेट स्वरूप सरिताने संन्यास घ्यायचा निर्णय घेतला सन् १९९८ दिनांक २७ मे ला तपस्वी रत्न परम पूज्य गुरुदेव श्री सुमति प्रकाशजी महाराज द्वारे जैन भागवती दीक्षा ग्रहण केली. *सरिता आता साध्वी सरिताश्री जी झाली.*
त्यांनी आपल्या जीवनात फार उतार चढ़ाव पहिले. खुप संघर्ष केले .शून्यातुन सुरुवात केली. आणि दीक्षेच्या अवघ्या २वर्षातच स्वतंत्र चातुर्मास करायला पूढे आल्या.
संन्यास जीवन मात्र १५ वर्षाचेम्हणजे वयाचे मात्र ३८वर्ष एवाढयाश्या लहान वयात त्यांनि खूप काही केल."आयुष्य लहान पण कीर्ति महान"
त्यांच्या सहवासात जे कोणी आल त्यांनि त्याला धर्माची आवड लावली आत्म्याची बोधि दिली. मनात संवेग भाव जगवले.त्यांचि ती हिम्मत तो दबंग पणा ती दृढ़तेची प्रतिमा तिच्या सारखी मात्र तिच.
लहानश्या जीवनाला जगुन जगाला एक प्रेरणा देवुन जानारी ती आमची गुरु माउली आज आमच्या सोबत नाही पण आजूनही तीचे आभास होत आहे की ती आमच्या जवल आमच्या सोबत आहे.
*देवा!हे आभास नेहमी आमाच्या हृदयात राहु दे..*
*ती कूठे ही असो तिला भाव स्पंदन होऊ दे..*
गुरुमाऊलिच्या स्मृति मध्ये मागच्या दोन वर्षापासुन सरिता पर्व रुपाने ७दिवस प्रेरणा मिलतील अशा स्पर्धा घेवून सरीत प्रेरणा प्रमाण पत्र व पुरस्कार देवून हे स्मृति दिवस भक्ति भावाने मनवितो.
-उपप्रवर्तीनी साध्वी वन्दनाश्री जी म. सा.