पोउनि योगेश ढिकले लाखांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात..मेहुणबारे पोलिस ठाण्यात प्रचंड खळबळ..


पोउनि योगेश ढिकले लाखांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात..मेहुणबारे पोलिस ठाण्यात प्रचंड खळबळ..


चाळीसगाव दि.०२(प्रतिनिधी) : तक्रारदारास गुन्ह्यात मदत करून दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात साडेचार लाखांची मागणी करून तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या मेहुणबारे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक योगेश जगन्नाथ ढिकले यास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आरोपी उपनिरीक्षक योगेश ढिकले हे एका गुन्ह्यात तपास अधिकारी आहेत.गुरनं. 72 /2022 अन्वये एक गुन्हा दाखल असून त्यात संशयीत आरोपी असलेल्या तक्रारदाराला गुरुवार व शनिवार हजेरी लावण्याचे आदेश असून या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी तसेच हजेरी अॅडजस्ट करून तक्रारदाराला गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी ढिकले याने साडेचार लाखांची मागणी केली होती व त्यात एक लाख रुपये तडजोडीअंती देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला. गुरुवारी दोन  वाजता आरोपी ढिकले याने पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळून गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात सहकाऱ्यांनी केला.

हि धडक कारवाई  श्री.सुनील कडासने  (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), श्री.एन.एस.न्याहळदे,  (अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), .श्री. सतीश डी.भामरे, , (वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक )यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील यांच्या निगराणीत   PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ  यांनी  यशस्वीपणे पार पाडली.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने