मा.नगरसेवक सतीश चेडे यांचा आंदोलनाचा इशारा.. तात्काळ शौचालयांची साफ सफाई व सोलर लाईटची व्यवस्था

 




मा.नगरसेवक सतीश चेडे यांचा आंदोलनाचा इशारा.. तात्काळ शौचालयांची साफ सफाई व सोलर लाईटची व्यवस्था

पाचोरा दि.०३ (प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार);पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील वरखेडी रोड वरील गेल्या  तीन वर्षा पुर्वी नगरपालिका प्रशासनाने "स्वच्छ सर्वेक्षण लीग-20-20 अंतर्गत"- लाखों रुपये खर्चून "सार्वजनिक शौचालय" बांधले असुन शौचालयाची दूरावस्था झालेली आहे,या शौचालयाची सुधारणा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व मा.नगरसेवक सतीश चेडे यांनी  आठ दिवसांआधी नगरपालिका प्रशासनावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.यावर मुख्याधिकारी सौ.शोभाताई बाविस्कर यांनी तातडीने  शौचालयाची स्व पाहणी करून सुधारणा करण्यासाठी आदेशानुसार शौचालयाची कामे लागलीच सुरुवात झाली आहे,तसेच पाचोरा-भडगाव चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार या.किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा शहरात "सोलर लाईट उपलब्ध झाले. प्रभाग क्र.3मधील त्र्यंबकनगर लगत बहीरमनगरमधील अंधारमय  भागात मा.नगरसेवक सतीशचेडे यांच्या प्रयत्नातून  मा.मुख्याधिकारी यांनी "सोलर" लाईटाची उभारणी तातडीने करण्यात आली,तसेच बहिरमनगरभागात अजुन रस्ता व अतिक्रमणाच्या व उर्वरित समस्या आहेत त्या मा.मुख्याधिकारी सौ. शोभाताई बाविस्कर जी लवकरच  लक्ष देतील  नागरिकांत अपेक्षा चर्चिले जात आहे,व त्यांना अपेक्षा लागुन आहे....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने