गणपूर येथे घटसर्प व फऱ्या रोग लसीकरण शिबीर




 गणपूर येथे घटसर्प व फऱ्या रोग लसीकरण शिबीर                               गणपूर (ता चोपडा)ता 3:  येथे हातेड पशु वैद्यकीय दवाखान्यामार्फत मान्सून पूर्व फऱ्या व घटसर्प या संसर्गजन्य रोगांच्या लसीकरणाचे शिबीर घेण्यात आले.यावेळी 400 गाई ,म्हशी ,व बैलांना लसीकरण करण्यात आले.                               पावसाळ्यात फऱ्या व घटसर्प हे दोन्ही आजार जनावरांमध्ये दिसून येतात.त्यासाठी अगोदरच हे लसीकरण शिबीर घेण्यात आल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ, संतोष भागवत कनके यांनी सांगितले.यावेळी डॉ कनके ,इकबाल शेख,किरण शिरसाठ,धर्मा पाटील,प्रकाश माळी यांनी गुरांना लसीकरण केले.ग्रामपंचायत चौकात शिबीर घेऊन,गुरांची पावसाळ्यात घ्यावयाच्या काळजीवर डॉ कनके यांनी माहिती दिली.शिबिरासह गोठयांमध्येही हे लसीकरण करण्यात आले............गणपूर..गुरांना घटसर्प व फऱ्या ची लस देतांना डॉ संतोष कनके.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने