चोपडा दि.०२ ( प्रतिनिधी ) - शहरातील नारायणवाडीभागात असणाऱ्या डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या जनसेवा हॉस्पिटल मध्ये एका गरीब आदिवासी महिलेवर पोटाची शस्त्रक्रिया करून तब्बल साडे किलोचा मांसाचा गोळा काढुन सदरच्या महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टर मंडळींना यश आले.
याबाबत सविस्तर असे की,बारवलीबाई तुकाराम बारेला ( ३५ ) रा.चिलाऱ्या ता.सेंधवाया आदिवासी महिलेला अनेक वर्षांपासून पोट दुखीचा त्रास होता,पोटात मोठी गाठ असून त्या मुळे पोटदुखी आहे हे निदान झालेले होते मात्र सदर महीला गरीब असल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते,अनेक दवाखाने फिरत ती डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या जनसेवा हॉस्पिटल मध्ये पोचली असता कमीत कमी खर्चात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येऊन ४.५ किलोचा गोळा काढण्यात आला. शस्त्रक्रियेसाठी डॉ.महेश लाडे ( सर्जन ) डॉ.चंद्रकांत बारेला,डॉ.नरेंद्र पाटील भुलतज्ञ, डॉ.सौ सोनाली बारेला,डॉ.सौ.मनीषा लाडे,स्त्री रोगतज्ञ,कर्मचारी राकेश पावरा,प्रिया वासकले, ममता चौहान,राहुल बारेला यांनी परीश्रम घेतले.