आल्मी तहेरीक सुन्नी दावते इस्लामी चोपडा तर्फे व्यसन मुक्ती वर सुन्नी इजतेमा संपन्न
चोपडा,दि.०१(प्रतिनिधी)31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त मंगळवारी आल्मी तहेरीक सुन्नी दावते इस्लामी शाखा चोपडा तर्फे व्यसना चे दुष्परिणाम व त्याच्यातून होणारे आजार या सुन्नी इजतेमा यशस्वी पणे पार पडला के, जी, ऐन, कॉलनी येथील नेशनल उर्दू स्कूल च्या प्रांगणात कुराण पाक च्या पठणाने प्रारंभ झाला या वेळी आले रसूल हजरत मौलाना सैय्यद अमिनूल कादरी साहेबांनी नशा आणि इस्लाम या विषयी उपस्थित लोकांना सविस्तर माहिती दिली ,इस्लाम मधे व्यसन ला कोणतीही जागा नाही 1450 वर्षांपूर्वी प्रेषित मोहम्मद साहेबांनी व्यसनाला हराम घोषित केले ,जर तुम्हाला व्यसन करायचाच आहे प्रेषितांनी दाखवलेले मार्गाचे करा ज्याचं ने कोणत्याही व्यक्ती गैर मार्गाला जाणार नाही ,त्यांचा नंतर प्रमुख मार्गदर्शक दाई ए कबीर हुजूर अमिरे सुन्नी दावते इस्लामी हजरत अल्लामा शाकिर अली नुरी साहब किबला यांनी आपल्या सुंदर वाणीतून सांगितले की पाप करण्यापासून आपल्याला थांबवा पाप ला लहान समजू नका ,अल्लाह प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघतो आहे ,इजतेमा च्या शेवटी सलाम, आणि दुवा करण्यात आली त्यामध्ये सर्वांनी सुख समाधाने जगावे ,व देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली, या वेळी शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक अवतार सिंग चौहान साहेबांचे व पोलीस बांधवांचे सुन्नी दावते इस्लामी तर्फे आभार व्यक्त करण्यात आले
इजतेमा यशस्वीते साठी हाजी अब्दूल वारीस,फिरोज खान (बबलू भाई),हाजी मुश्ताक जहागीरदार, सैय्यद मसूद अली ,राज मोहम्मद खान,हाजी अब्दुल सत्तार, हाफिज ओवेस ,अजहर रजा, व दिगर मुबल्लगीन व मुवन्नईन सुन्नी दावते इस्लामी व नवजवानाने अहेले सुन्नत चोपडा यांनी परिश्रम घेतले