महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून समाज बांधवांस मदतीचा हात
त-हाडी,ता.शिरपूर दि.२०( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे) आला आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त भावनेने एक हात मदतीचा पुढे करून खऱ्या लाभार्थ्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा कडून एका समाज बांधवांचे झालेले नुकसान पाहून त्याला एक मदतीचा हात देण्याचा हा छोटासा प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मेनागाव या गावचा आपल्या समाजाचा समाज बांधव किशोर भागवत वाघ याचे सलुन दुकान दिनांक 6 मे 2022 रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी जाऊन भस्म झाले म्हणून व्यवसाया पासून वंचित होऊन सलून टपरी जळाल्यामुळे त्याच्यातील साहित्याची राख झाल्यामुळे आणि अशा परिस्थितीत अशा या दुर्दैवी संकटांतुन किशोर वाघ जात असल्यामुळे ही बाब महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्ह्याने ओळखून या बांधवांना आपण काहीतरी मदत करावी आणि त्याला पुन्हा उभे करावे या उदात्त भावनेने सर्वतोपरी मदत करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाची धुळे जिल्हा टीमने केलेल्या आव्हाना नुसार महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे दिलदार व्यक्तिमत्व जळगाव येथील समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व ओबीसी नेते किशोर भाऊ सूर्यवंशी यांनी भरीव मदत केली पुन्हा अमळनेरच्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षा भारतीताई सोनवणे यांनीही मदतीचा हात दिला तसेच राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री गोकुळ नाना येशी आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा व राज्य कर्मचारी महामंडळ, युवक महामंडळ, सर्व पदाधिकारी मिळून या समाज बांधवाला आपल्या दुकानाचे साहित्य यात खुर्ची सलून मटेरियल साहित्य देऊन पुन्हा आपल्या व्यवसायाला उभे करण्याचा हा छोटासा एक प्रयत्न
यानंतर नाशिक जिल्ह्यातील एका समाज बांधवांचे विज कोसळून दोन बैल जागीच ठार झालेले आहेत या आपल्या समाज बांधवाला ही लवकरच भरीव मदत करू असे महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्ह्याच्या सर्व स्टीमने संकल्प केला आहे.