*मुक्ताई नगरीत प्रथमच लहान वयोगटातील गुणवंत मुला मुलींचा सत्कार समारोह संपन्न*



 मुक्ताई नगरीत प्रथमच लहान वयोगटातील गुणवंत मुला मुलींचा सत्कार समारोह संपन्न*

मुक्ताईनगर दि.२०( प्रतिनिधी )दोन वर्षांपासून कोरोनाने घातलेल्या थैमाणामुळे विद्यार्थी हा शिक्षणापासून खुप दुरावलेलाच होता.पण तरीसुद्धा हा संकटमय काळ संपता फक्त 4 ते 5 महिन्यात गायकवाड क्लास मध्ये विदयार्थ्यांचा प्रगतीचा आलेख चढताच ठरला. 8 ते 14 वयोगटातील मुले / मुली यांच्या शैक्षणिक प्रगतीला,कलागुणांना,वाव देण्यासाठी,त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी, मेहनत व संघर्ष हेच यशाचे उत्तम मार्ग आहे,लहानपणा पासूनच जर या गोष्टीची जाणीव विदयार्थ्यांना झाली तर विदयार्थ्यांची प्रगती होते,या मुला मुलींना शैक्षणिक जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून मुक्ताईनगर येथील सतीश गायकवाड सर यांनी त्यांच्या क्लास मधील इ.3 री ते 7 वी पर्यंतच्या मुला मुलींचा प्रगतीचा आलेख पाहून सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता,फक्त 4/ 5 महिन्यात विदयार्थ्यांनी खूप प्रगती करून शालेय निकाल उत्तम लावला ही बाब खरोखर उल्लेखनीय आहे, त्यांना प्रेरणा मिळावी,त्यांनी जीवनात खुप प्रयत्न करावे व प्रगतीशील व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रम आयोजक श्री सतीश गायकवाड सर,कार्यक्रम प्रमुख मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे पोलीस अंकुश बाविस्कर सर,गोकुळ पाटील व क्लास मधील विद्यार्थी  व पालक वर्ग उपस्थित होते.तृप्ती सुभाष हिरळकर,आकाश जाधव,आनंद जाधव,नैतिक बाविस्कर,अमर संजय बाविस्कर,प्रेमराज कृष्णा वराडे,इशांत सुरेश वाघ,प्रतीक विजय डोळसे,नैतिक करोसिया, कार्तिक रवी नाईक,गुंजन निलेश भालेराव,राधिका हिरळकर,यश बाविस्कर,आदर्श गोकुळ पाटील शेख अयान,शेख रेहान,या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

अतिशय आनंदमय वातावरणात विदयार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्याने व मेहनतीने कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने