जि.प.सदस्य किरण पाटील यांच्या निधीतून पांझरा नदी पूलाचे दुरूस्ती कामास प्रारंभ.. प्रसारमाध्यमांच्या वृत्ताची दखल
धुळे दि.२०(प्रतिनिधी) न्याहळोद येथील पांझरा नदी पात्रात बांधण्यात आलेल्या पूलाची दैनंनिय अवस्था झाली असून पूल अखेरची घटका मोजत आहे, या संदर्भात अनेक वृत्तपत्रांना बातमी प्रकाशित करण्यात आली होती, त्याची दखल घेऊन कामाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
2004-5 दरम्यान बांधण्यात आलेल्या पूल अखेरची घटका मोजत असून दुरुस्तीची मागणी वारंवार जोर धरीत होती. त्यावेळेस निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे पूलवरच्या सळया (गज) उघडे झाले असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे फुलावर विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना पायी चालणे देखील जिगरीचे झाले होते, धुळे अमळनेर तालुक्याला जोडणारा पाझरा नदीवरील पूल विश्वनाथ सुकवड मोहाडी आदी गावांना हा पुल फायदेशीर ठरत असतो, अनेक वेळा पूल दुरुस्ती च्या मागण्या करून देखील कानाडोळा होत असल्याने छोटे-मोठे अपघात घडत होते, परंतु नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील यांच्या कडे न्याहळोदचे पत्रकारांनी जि.प सदस्य किरण पाटील यांच्याकडे तगादा लावून धरल्यामुळे त्यांनी स्थानिक निधीतून पूल दुरुस्तीकरण करण्याचा निर्णय घेतला या कामाचा शुभारंभ झाला असुन याप्रसंगी किरण पाटील यांच्या पत्नी मुकटी गटातील सदस्य सौ.मीनल ताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य आप्पा पवार, अमित जैन, उमेश पवार, भगवान बाविस्कर, सावकार कोळी, सचिन भावसार, बटू पाटील ग्रामस्थ उपस्थित होते.