राष्ट्रीय जनसेना पार्टीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सरला शिंपी
धुळे-दि.२०(प्रतिनिधी)- राष्ट्रीय जनसेना पार्टीच्या, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सरला शरद शिंपी(देवकुळे) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तशा आशयाचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
सरला शरद शिंपी (देवकुळे) या गेली अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत सरला शिंपी यांची ही नियुक्ती करण्यात आली. लोकप्रतिनिधीत्व अधिनियमानुसार, भारत निर्वाचन आयोगाद्वारा राष्ट्रीय जनसेना पार्टी हा मान्यता प्राप्त पक्ष आहे. राज्यातील सर्व जाती धर्माच्या जनतेच्या हितासाठी स्वच्छ राजनिती की ओर या संकल्पनेतुन तसेच सामाजिक, राजकीय कार्यासाठी ८०% समाजकारण व २০% राजकारण या हेतू व उद्दशाने राष्ट्रीय जनसेना पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय जनसेना पार्टीच्या संविधानुसार भारत देशाची प्रभुता व अखंडता शाबूत ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये पंथ - निरपेक्षता, धर्म - निरपेक्षता व लोकशाहीच्या सिद्धांताप्रती खरी निष्ठा आणि श्रद्धा निर्माण करून त्यांच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय व हक्कांच्या रक्षणासाठी भारतीय संविधानानुसार जन आंदोलनाच्या माध्यमातून, स्थापित मुल्यांच्या अनुरूप या पार्टीचे काम सुरु आहे. राष्ट्रीय जनसेना पार्टीच्या धुळे जिल्हा महिला अध्यक्ष या पदावर नियुक्त सरला शिंपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील दि. २१ मे २०२५ पर्यंत अस्थायी राहणार आहे. राष्ट्रीय जनसेना पार्टीच्या विचारधारा व संविधानुसार हेतु व आपल्या यशस्वीतेसाठी निष्ठापूर्वक काम करण्याचे आवाहन या नियुक्तीपत्र करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.