योगाचा अंगीकार करा चोपड्यात योग दिन संपन्न
*चोपडा*दि.२१(प्रतिनिधी)- 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरावर श्रीराम नगर चोपडा येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी. चौधरी, प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, श्रीराम जुलाल मिस्त्री यांनी दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी योगशिक्षक के. डी. चौधरी सर यांनी जीवनात योग व त्याबरोबर ध्यानाचे महत्त्व विषद करून रोज योग करा रोगापासून दूर राहा, असा मोलाचा सल्ला दिला. त्यानंतर उपस्थितांनी ध्यानाचा आनंद घेतला. सुरुवातीला संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची पूजा व माल्यार्पण महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. धनश्री चौधरी यांनी केली. मंदिरात हरिपाठ म्हनन्यात येऊन शिबिर संपन्न झाले. शिबिरासाठी श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा उपाध्यक्ष टी. एम. चौधरी, विश्वस्त राजेंद्र चौधरी, सूर्यकांत चौधरी आदींनी परिश्रम घेतले. शेवटी योग हटाये रोग, योग दिनाचा विजय असो. अशा घोषणा देऊन शिबिराची सांगता करण्यात आली. प्रशांत चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.