निमगव्हाण ग्रा. पं.च्या उपसरपंच पदी संजय बिऱ्हाडे यांची बिनविरोध निवड
"चोपडा दि.२५ (प्रतिनिधी) तालुक्यातील निमगव्हाण येथील पूर्व ग्रामपंचायत उपसरपंच यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे निमगव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच पद रिक्त झाल्याने निवडणूक जाहिर करण्यात आली या पदासाठी संजय दगडू बिऱ्हाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पं.स. समिती विस्तार अधिकारी श्रीयुत जे. पी. पाटील यांनी ग्रा.प.च्या उपसरपंच पदी संजय दगडू बिऱ्हाडे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी सरपंच दिनेश भास्कर सपकाळे व 'सदस्य उषाबाई कांतीलाल पाटील, देवानंद लक्ष्मण पाटील,मनिषा दिलीप पाटील, आशाबाई लखीचंद बाविस्कर, ललिता धनराज पाटील, आदी ग्रा. प. सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामसेवक राधा भिकन चव्हाण शिपाई हर्षल दिलीप पाटील, विशेष सहकार्य लाभले. तसेच दिलीप देविदास पाटील, संदिप भानुदास कोळी, सचिन अशोक बाविस्कर , कांतीलाल पाटील आदिंनी शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला या निवडीमुळे संजय बिऱ्हाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.