चोपडा रोटरी क्लबतर्फे भव्य आरोग्य शिबीर व मोफत औषधींचे वाटप...*

 

*चोपडा रोटरी क्लबतर्फे भव्य आरोग्य शिबीर व मोफत औषधींचे वाटप...*


     चोपडादि.२५ (प्रतिनिधी) :--- चोपडा रोटरी क्लब ऑफ तर्फे तालुक्यातील आदिवासी भागातील बिडगाव येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधींचे वाटप करण्यात आले .यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर हे अध्यक्षस्थानी होते.

      सदर शिबीरात बिडगाव परिसरातील मोहरद , कुंड्यापाणी ,चांदण्या तलाव या गावांसह इतर दहा आदिवासी गावातील ४०० रुग्णांनी सदर शिबिराच्या लाभ घेतला .सदर शिबीरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन  ,रुग्णांना दोन लाख रुपयांची औषधी मोफत वाटप करण्यात आली.

      रुग्णांची तपासणी कामी  चोपडा येथील डॉ. पराग पाटील ( स्त्री रोग तज्ञ ) ,  डॉ. नीता जैस्वाल , डॉ.अमोल पाटील ,  डॉ. प्रफुल्ल पाटील  ( बालरोग तज्ञ  ) डॉ.सचिन कोल्हे ( नेत्ररोग तज्ञ ) ,डॉ. भूषण सोनवणे ( हृदय रोग तज्ञ )  आदींनी रुग्णांना मोफत सेवा दिली 

    तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर आपल्या मनोगतात म्हणाले की ,  तालुक्यातील बिडगाव परिसर हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. सदर भागात अजूनही अनेक प्रकारच्या आरोग्याच्या सोयी सुविधांची कमतरता जाणवते. आदिवासी दुर्लक्षित परिसरामध्ये रोटरी क्लब ऑफ चोपडा या सेवाभावी संस्थेने भव्य आरोग्य शिबीर व मोफत औषधी वाटप करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे .तालुक्याच्या आदिवासी भागात घेतलेला उपक्रम  स्तुत्य स्वरूपाचा  असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आदिवासी भागात सर्वरोग निदान शिबीर घेतले . शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली व सुमारे दोन लाख रुपयांची मोफत औषधी देखील वाटप करण्यात आली तसेच महालॅबतर्फे आदिवासी भागातील नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली त्याबद्दल त्यांनी रोटरी क्लब चोपडाचे विशेष आभार व्यक्त केले .

     सदर कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले  ,सचिव प्रवीण मिस्त्री , प्रोजेक्ट चेअरमन संजीव गुजराथी ,प्रोजेक्ट को चेअरमन डॉ. पराग पाटील , प्रोजेक्ट  को चेअरमन  नयन  महाजन यांची विशेष उपस्थिती होती तसेच नितीन अहिरराव , रुपेश पाटील,  चेतन टाटिया, अर्पित अग्रवाल , अरुण सपकाळे , प्रदीप पाटील,  चंद्रशेखर साखरे,  नितीन जैन , धिरज अग्रवाल ,  दिलीप जैन , भालचंद्र पवार  ,पृथ्वीराज राजपूत आदी रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सदर भव्य आरोग्य शिबीर व मोफत औषधींचे वाटप कार्यक्रमास सौ. विजया पाटील (सरपंच ) , रामकृष्ण पाटील (पोलिस पाटील ) , बिडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वसीम शेख यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच आशा वर्कर यांचे मोलाचे योगदान लाभले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार भालचंद्र पवार यांनी केले....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने