*रोटरी क्लब चोपडाच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला*
चोपडा दि.३०(प्रतिनिधी)जागतिक स्तरावर सेवाभावी काम करणाऱ्या *रोटरी* या संस्थेच्या डिस्ट्रिक्ट3030अंतर्गत रोटरी क्लब चोपडा यावर्षी 52 व्या वर्षात यशस्वीरीत्या पदार्पण करीत आहे. रोटरी चे नवीन वर्ष हे एक जुलै रोजी सुरू होत असते. 2022-23 या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने अध्यक्ष म्हणून श्री ॲड रुपेश पाटील, मानद सचिव म्हणून श्री गौरव महाले आणि कोषाध्यक्ष श्री पृथ्वीराज सिंग राजपूत तर सहप्रांतपाल म्हणून श्री नितीन अहिरराव यांनी आपला पदभार स्वीकारला आहे .
सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत रोटरी क्लब चोपडा चे कार्य अधिकाधिक विस्तार करून क्लबचे नाव यापुढेही गौरविले जाईल असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.