शासकीय कन्या आश्रमशाळेत आदिवासी मुलींना सॅनेटरी पॅडचे वाटप...चोपडा रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम...

 



शासकीय कन्या आश्रमशाळेत आदिवासी मुलींना सॅनेटरी पॅडचे वाटप...चोपडा रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम...

    चोपडा दि.३०(प्रतिनिधी) :---तालुक्यातील आदिवासी भागातील शासकीय माध्य. व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा वैजापूर या शाळेत विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे ५००० सॅनेटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

   रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांनी १ जुलै २०२१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून तर आज ३० जून २०२२ रोजी अध्यक्षपदाचा शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, आरोग्य, क्रीडा ,रोटरी उत्सव, आदिवासी, गरजू, स्तनदा माता ,कुपोषित बालके  आदींसाठी विविध उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबविले .त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी भागातील मुलींमध्ये मासिक पाळी या विषयासंदर्भात अधिक जाणीव जागृती व्हावी या हेतूने ५००० सॅनिटरी पॅडचे वाटप व मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

    सदर कार्यशाळेत डॉ. योगेंद्र पवार यांनी मासिक पाळीविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि मासिक पाळीकडे पाहण्याच्या शास्त्रीय दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला .स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध आरोग्यासोबत असतो . अशावेळेस स्त्रीने मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखणे आवश्यक आहे जर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर स्त्रियांमध्ये अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात असे मत व्यक्त केले.

   डॉ.मोनिका हांडे आपल्या मनोगतात  म्हणाल्या की , मासिक पाळीचा कालावधी बहुतेक महिलासाठी तणावपूर्ण असतो. या दिवसात स्वच्छता राखण्याची मोठी गरज असल्याचे त्या म्हणाल्या . निष्काळजीपणामुळे आरोग्यावरच नकारात्मक परिणाम होऊन यीस्ट इन्फेक्शन सारख्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

   रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले  आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की ,मासिक पाळी संदर्भात समाजमनामध्ये अनेक समज व गैरसमज आहेत ते घालवणे काळाची गरज असून विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी संदर्भात सकारात्मक  विचारांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत रोटरीच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबवले असल्याचे ते म्हणाले. सर्व उपक्रम व कार्यक्रम  त्यांनी विशद केले.

     सॅनेटरी पॅड वाटप प्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले , सचिव प्रवीण मिस्त्री ,प्रकल्पप्रमुख तेजस जैन, प्रसन्न गुजराथी , डॉ योगेंद्र पवार , डॉ. मोनिका हांडे ,डॉ. शोएब सय्यद आदी उपस्थित होते.

  कार्यशाळा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही बी माळी , श्रीमती एस आय तडवी ,श्रीमती एस ए टेंभुर्णे ,पी बी बडगुजर ,जे एस कंखरे ,ए सी बारेला ,वाय एस चौधरी व श्रीमती एस आर बारेला आदींनी परिश्रम घेतले.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने