राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श राजकीय नेत्यांनी घ्यावा जयसिंग वाघ
मनमाड दि.२७( प्रतिनिधी ) राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यातील सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिलेला आहे , सर्वांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे , देशाच्या विकासाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत नेलेली आहे , देश म्हणजे देशातील माणसे तेंव्हा देशाचा विकास करून जनतेचा विकास कसा करता येईल याचा त्यांनी प्रत्येक वेळेस विचार केलेला आहे देशाच्या विकासात धर्माचा विचार करूनये धर्म ही व्यक्तिगत बाब आहे असे सांगितले आहे त्यांचे विचार हे आदर्शराज्य निर्माण करण्यास पूरक आहेत तेंव्हा प्रत्येक राजकीय नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले
फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधिनी मनमाड तर्फे नगरपालिका सभागृहात दिनांक 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून जयसिंग वाघ बोलत होते
ए पी आय गौतम तायडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात शाहू महाराजांच्या विवीध कर्यांची माहिती दिली , शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक , राजकीय , प्रशासकीय , शैक्षणिक सुधारणा या क्रांतीकारक स्वरूपाच्या होत्या , त्यांच्या विचारधारेचा व कार्याचा प्रभाव भारतीय संविधानावर सुद्धा पडलेला आहे असे सांगितलेशाहू महाराज यांनी महिलांच्या विकासार्थ केलेल्या कार्याची माहिती आम्रपाली निकम , अलका नागरे , वर्षा झालटे यांनी दिलीमनमाड शहरातील विवीध 15 संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रसंगी आपले विचार थोडक्यात मांडली
शाहू महाराज , शिवाजी महाराज , महात्मा फुले , बाबासाहेब आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ पवार होते माजी आमदार जगन्नाथ धात्रप यांनी प्रबोधनाच्या प्रत्येक कार्यक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले
कार्यक्रमास अशोक परदेशी , किशोर सोनवणे , राजेंद्र पारीख , निलेश सपकाळे , जे वाय इंगळे , सुनील गवांदे , अहमद बेग मिरझा , राजेन्द्र आहेर , शरद झाम्बड , आर आर दरगुंडे , विष्णू चव्हाण , मोहन पिरणाईक , रतन सोनवणे , स्वप्नील व्यवहारे , मुरलीधर ससाणे , धर्मपाल बहोत , मयूर वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केलेकार्यक्रमास श्रोतावर्ग मोठ्या संख्येने हजर होता