यावल चोपडा महामार्गावर अतिक्रमणचा विळखा.. सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळे झाक कशासाठी ?अहो रावसाहेब तात्काळ लक्ष घाला नाहि तर होऊ शकतो अनर्थ..!
यावल दि.27(प्रतिनिधी सुरेश पाटील) बऱ्हाणपूर–अंकलेश्वर तथा यावल चोपडा या महामार्गावर मोठमोठ्या जड वाहनांची वाहतूकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ,रहदारी असलेल्या महामार्गावर म्हणजे यावल पोलीस स्टेशन पासून 300ते 400 मीटर अंतरावर जिनिंग प्रेस प्रवेशद्वाराच्या समोरच आणि महालक्ष्मी किराणा भव्य अशा दुकानासमोर आणि इतर ठिकठिकाणी फळ विक्रेते आणि इतर व्यवसायिकांनी अतिक्रमण केले त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहन धारकांना नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
यावल शहरात ठीक–ठिकाणी सार्वजनिक वापराच्या रस्त्याच्या आजूबाजूला व शासकीय जागावर झालेल्या अनधिकृत बेकायदा अतिक्रमणा बाबत गेल्या तीन महिन्यापूर्वी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील(आदरणीय अण्णा हजारे कृत)यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली होती आणि आहे.परंतु या बाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही ते आता यापुढील कारवाईस जबाबदार राहणार आहेत.
यावल पोलीस स्टेशन पासुन 100 मीटर अंतरापासून 200ते 300मीटर अंतरावर तसेच इतर सर्व ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला अनाधिकृतपणे बेकायदा हाथगाडीवाले आणि इतर व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात भर रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण झालेले आहे यामुळे सर्व प्रकारच्या वाहनधारकांना आणि पायदळ चालणाऱ्या स्त्री-पुरुषांना रहदारीस आणि जाण्या–येण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे,बऱ्याच वेळा किरकोळ अपघात होत असल्याने आप–आपसात भांडण तंटे होतात,एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडून यावल शहराची जातीय सलोखा,कायदा सुव्यवस्था,शांतता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, तसेच एखाद्या मोठ्या वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास किंवा वाहन नादुरुस्त झाल्यास भर रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण धारकांची मोठी जीवितहानी होईल असे सुद्धा आता यावल शहरात बोलले जात आहे.
यावल शहराच्या या गंभीर समस्येकडे यावल पोलीस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे, फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग,फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कृणाल सोनवणे,यावल तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता तडवी साहेब,यावल नगर परिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे,यांच्यासह राजकारणातील दादा,आप्पा,भाऊ,यावल नगर परिषदेचे आजी,माजी अध्यक्ष आणि सदस्य तसेच सामाजिक संघटनांचे दुर्लक्ष होत असल्याचा तसेच ह्या सर्वांच्या नाकावर टिच्चून यावल शहरात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. यावल पोलीस स्टेशनला आयपीएस अधिकारी असताना कार्यवाही न झाल्याने यावलकर यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
संबंधित अधिकाऱ्यांकड़े लेखी तक्रार असताना त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने ते आता पुढील कायदेशीर कार्यवाहीस जबाबदार राहणार आहेत याची नोंद त्यांनी घ्यावी, असे सुद्धा पत्रकार सुरेश पाटील यांनी जनहितासाठी म्हटले आहे.