पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.....




पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.....

 चोपडादि.२४( प्रतिनिधी):--

      २१ जून रोजी जागतिक स्तरावर योग दिवस साजरा केला जातो. योग म्हणजे शरीर, मन , बुद्धी यांना एकत्रित जोडणारे शास्त्र होय. आजच्या काळाची गरज म्हणजे योग साधना. या योग साधनेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चे विद्यार्थी रममान झाल्याचे दिसले. अगदी चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी योग साधना केली.

यावेळी योग प्रशिक्षक के. पी. पाटील यांनी चक्रासन, पद्मासन, शिरसासन, अनुलोम, विलोम ,भ्रमरी प्राणायाम ध्यान मुद्रासन आदी आसनांचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवीली. योगासन शारीरिक व्यायाम, उत्तेजक हालचाली करतांना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसला.

 प्रसंगी किरण चौधरी यांनी योगसाधनेचे महत्व विषद केले व  काही विद्यार्थ्यांनी योगासन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य  मिलिंद पाटील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी आपला सहभाग नोंदवला.

सदर योगासने शाळेच्या भव्य प्रांगणात घेण्यात आली.

 या कार्यक्रमासाठी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.  सुरेश  बोरोले, उपाध्यक्ष  अविनाश  राणे, संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले, संचालक  भागवत भारंबे ,पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  व्ही.आर. पाटील, पंकज बाल संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील, पंकज ग्लोबल चे प्राचार्य मिलिंद पाटील,पंकज कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव वाघमोडे, पंकज इंग्लिश मीडियमचे प्राचार्य संदीप वन्नेरे आदींनी शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने